पत्रकार-सुधीर घाटाळ -9834756487-पालघर जिल्ह्यातील उबाठा गट महिला आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी आज मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थितांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेत, पक्षाशी निष्ठा जाहीर केली.

यात महिला जिल्हाप्रमुख निलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा पाटील, जमीला सय्यद, प्रीती मोरे, ललिता कोळी, जितेंद्र दळवी, भावेश धर्ममेहेर, मंगेश बात्रा, माजी सरपंच विकास पाटील, विवेक घरत, विनीत पाटील, कामिनी पाटील, जयेश कोरे यांचा समावेश होता.
तर डहाणू तालुक्यातील माजी उपसभापती पिंटू गहला, काजल राबड, जयश्री करामोडा, सुरेंद्र राबड, पंचायत सदस्य नरहरी दायत,रमेश बारगा, नेहा धर्मामेहेर, क्रीती मंत्री, कौशिक निकोले, तुषार आरडी, नंदू डगला तसेच इतर अनेकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या सोहळ्यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, राजेश शहा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद ग्रामीण भागात अधिक वाढली असून, महिला आघाडीमुळे पक्ष संघटनाला नवचैतन्य मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.













