डहाणू : अलीकडील पुरपरिस्थितीत मदतीचा हात पुढे करत महालक्ष्मी मंदिर ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांच्या स्वाधीन करण्यात आली.या मदत उपक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांचा विशेष पुढाकार राहिला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला असून, नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाबरोबर विविध सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.

महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील भूमिका इतर संस्थांसाठी आदर्शवत असल्याचे जिल्हाधिकारी महोदया तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी अध्यक्ष संतोष देशमुख, उपाध्यक्ष चंदू सातवी व संपूर्ण ट्रस्टचे अभिनंदन केले.पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेली ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधी कडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.












