
गंजाड गॅलनपाडा, दि. २९ मार्च २०२५ – शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या उद्देशाने मोहित मुस्कान फाऊंडेशनने जिल्हा परिषद शाळा गंजाड गॅलनपाडा यांना स्मार्ट टीव्ही, ई-लर्निंग डिव्हाइस आणि प्रिंटर प्रदान केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी शिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे.या विशेष कार्यक्रमाला मोहित मुस्कान फाऊंडेशनच्या CEO प्रीती मॅडम, निशी जैन, सागर रेचे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले. डिजिटल शिक्षणाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होईल, असा विश्वास फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळेल. हा उपक्रम म्हणजे डिजिटल शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल मोहित मुस्कान फाऊंडेशनचे आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

