पत्रकार-सुधीर घाटाळ-9834756487
डहाणू तालुक्यातील आंबिस्ते सुतारपाडा येथे सुमारे महिनाभरापूर्वी वादळी वारा व मुसळधार पावसामुळे बायजी भिवा लहांगे या वृद्ध महिलेचे घर जमीनदोस्त झाले होते. त्या महिला घरात एकट्याच राहत असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, घर उद्ध्वस्त झाल्याने त्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या.

याबाबत ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष विलास सुमडा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला व पक्षाच्या माध्यमातून नक्कीच आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार पक्षाचे युवा नेते करण भाई ठाकूर यांच्याशी चर्चा करून त्यांनी लगेचच मदतीची रक्कम सुपूर्द केली.

यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आंबिस्ते सुतारपाडा येथे जाऊन बायजी भिवा लहांगे यांना ही मदत त्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. या वेळी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या जया ताई दुबळा, सुनीता घोडा, तसेच नवश्या काटेला, विकास करमोडा, नितीन धडपा, अजय वायेडा, जानु पिलेना यांच्यासह आंबिस्ते व साये गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी या मदतीबद्दल पक्षाचे आभार मानले असून, कठीण प्रसंगी समाजातील वंचित घटकांच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने होत असल्याचे मत व्यक्त केले.













