डहाणू तालुक्यातील बहुचर्चित गंजाड आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, गंजाड या संस्थेच्या पंचवार्षिक (२०२५-२०३०) निवडणुका नुकत्याच उत्साहात व शांततेत पार पडल्या.या निवडणुकीत शेतकरी आघाडी पॅनलने प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.

एकूण ११ जागांपैकी १० जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत शेतकरी आघाडीने आपली ताकद सिद्ध केली. दुसरीकडे, आदिवासी प्रगती आघाडी पॅनलला केवळ १ जागेवर समाधान मानावं लागलं.या निवडणुकीसाठी एकूण २० उमेदवार रिंगणात होते. गंजाड व रायतळी गावांमधील १२६ मतदारांपैकी ८५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडली.शेतकरी आघाडी पॅनलचे विजयी उमेदवार:अभिजीत उमापती देसक, कौशल जगन्नाथ कामडी, सुमित रामजी रडे, दत्तू रामदास डोंबरे, प्रविण चिंतू वरठा, नवश्या महादया डोंबरे, नरेश देऊ पारधी, पांडू बारक्या बेंडगा, विष्णू बाबू भोनर, आशा सुरेश गडग.
या दणदणीत विजयानंतर अभिजीत उमापती देसक यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आली, तर प्रविण चिंतू वरठा यांची उप-चेअरमन म्हणून निवड झाली.या विजयामुळे शेतकरी आघाडी पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी निवडणूक शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडल्याबद्दल निवडणूक अधिकारी व स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.

आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून स्थानिक शेती, अर्थकारण व विकास योजनांना नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत.

