दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
तलासरी तालुक्यातील आदिवासी भागात शिक्षणाचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या ज्ञानमाता सदन संस्था संचलित ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, झरी यांनी यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत (SSC) १००% निकालाची उज्वल परंपरा कायम राखत तालुक्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी HSC मध्येही शाळेने शंभर टक्के निकाल देत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

यंदाच्या परीक्षेसाठी एकूण १५६ विद्यार्थी बसले होते. त्यामधून एकाही विद्यार्थ्याचा नापास न होता सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. निकालाचे आकडे पुढीलप्रमाणे:
विशेष प्राविण्य – २१ विद्यार्थी
प्रथम श्रेणी – ६२ विद्यार्थी
द्वितीय श्रेणी – ६७ विद्यार्थी
उत्तीर्ण श्रेणी (Pass Class) – ६ विद्यार्थी
तिन्ही टॉप रँक धारक विद्यार्थ्यांचे टक्केवारी:
प्रथम क्रमांक – ९१%
द्वितीय क्रमांक – ९०.२०%
तृतीय क्रमांक – ९०%
या यशामागे संस्थेची दूरदृष्टी, प्राचार्य सि. बस्तियान यांचे कुशल नेतृत्व, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, डहाणू यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम हे घटक महत्त्वाचे ठरले आहेत.विशेषतः, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली ही संस्था केवळ शिक्षण नव्हे तर संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करत आहे. शाळेतील शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांसोबत व्यक्तिगत लक्ष देत अभ्यासात सातत्य, मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा यावर भर दिला.पालकांचा सहभाग आणि विद्यार्थींची मेहनत महत्त्वाची ठरली
विद्यार्थ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. यामध्ये पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहकार्य केले. काही पालकांनी मुलांना अभ्यासासाठी शांत वातावरण उपलब्ध करून दिले. तर काहींनी शाळेतील उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन दिले.संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव या उल्लेखनीय यशानंतर झरी शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी आणि ग्रामस्थांनी शाळेला अभिनंदन दिले आहे.

या यशाच्या निमित्ताने झरी शाळा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहे आणि ‘इच्छा असेल तर मार्ग निघतोच’ हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
