दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू–पालघर जिल्यातील डहाणू तालुक्यातील बहुचर्चित गंजाड आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, गंजाड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025 ते 2030 या कालावधीसाठी नुकतीच पार पडली. यामध्ये शेतकरी आघाडी पॅनलने प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली असून, 11 पैकी 10 जागांवर यश संपादन केलं आहे. दुसऱ्या पॅनलने केवळ एक जागा जिंकली आहे.

या निवडणुकीत शेतकरी आघाडी पॅनल आणि आदिवासी प्रगती आघाडी पॅनल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. गावात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण 126 मतदारापैकी 85 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आणि संपूर्ण परिसरात निवडणूक शांततेत पार पडली.

विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:
शेतकरी आघाडी पॅनलचे विजयी उमेदवार:
अभिजीत उमापती देसक
कौशल जगन्नाथ कामडी
सुमित रामजी रडे
दत्तू रामदास डोंबरे
प्रविण चिंतू वरठा
नवश्या महादया डोंबरे
नरेश देऊ पारधी
पांडू बारक्या बेंडगा
विष्णू बाबू भोनर
आशा सुरेश गडग
आदिवासी प्रगती आघाडी पॅनलकडून विजयी झालेली एकमेव उमेदवार:
लखमी शनवार विंधन

या विजयाबद्दल शेतकरी आघाडी पॅनलच्या कार्यकर्त्यांत व गावकऱ्यांत मोठा उत्साह आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले, याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आणि निवडणूक अधिकारी यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.
“ही जनता-शेतकऱ्यांची विजयगाथा आहे. आम्ही पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यक्षम कार्यपद्धतीसाठी कटिबद्ध आहोत. सर्वसामान्य सदस्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले.”
अभिजित देसक – विजयी उमेदवार
