डहाणू –जनतेच्या विश्वासावर राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, जनसंपर्कातून विकास साधणारे आणि अपक्ष म्हणून लोकांच्या मनात घर केलेले प्रभावी नेतृत्व – गंजाड ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच अभिजित उमापती देसक यांचा आज, २३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे.
अभिजित देसक यांचा जन्म २३ जून १९८५ रोजी गंजाड (ता. डहाणू, जि. पालघर) येथे झाला. लहानपणापासूनच भाषणकलेची आवड आणि दुसरीपासूनच मंचावर बोलण्याचे धाडस त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून आले. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी त्यांनी राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आणि २०११ मध्ये, केवळ २५व्या वर्षी डहाणू पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येत प्रभावी उपस्थिती नोंदवली.
२०१६ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर त्यांनी विद्यमान सरपंचाचा पराभव करत गावपातळीवर नवे नेतृत्व उभे केले. त्यानंतर २०२२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढत गंजाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर बहुमताने विजय मिळवून त्यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यांच्या पुढाकारातून इतर ग्रामपंचायतींमध्येही सदस्य व उपसरपंच बसवण्यात यश मिळाले.
सध्या अभिजित देसक हे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. ते अखिल भारतीय सरपंच परिषद – पालघर जिल्हा सरचिटणीस, आदिवासी धारणा फार्मर प्रॉड्युसर कंपनीचे संचालक अध्यक्ष, दृष्टीकोन या सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि गंजाड सोसायटीचे संचालक अध्यक्ष आहेत.
स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क अत्यंत बळकट असून, लोकांच्या अडचणी सोडवण्याची तळमळ, सरकारी योजनांची अंमलबजावणी, शिबिरांद्वारे जनजागृती, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य, शैक्षणिक सुविधा, गॅस योजना, घरकुल यांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी शेकडो नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे.
23 जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, “अनेकांच्या जीवनात प्रकाश देणारे नेतृत्व…!” असा उल्लेख करून नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत.
