ता. २१ जुलै २०२५ शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित शाखा जव्हार (जि. पालघर) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शाखेने आपल्या कामगिरीतून राज्यातील इतर कार्यालयांसमोर आदर्श उभारला आहे. लाभार्थ्यांशी थेट संवाद, कर्ज वसुली प्रक्रियेतील सुलभता, योजनांचा पारदर्शक अंमल आणि माहितीचा वेगवान प्रसार यामुळे या कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
जव्हार कार्यालयाने डिजिटल माध्यमातून विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत ‘गाव तिथे योजना’ हा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय निहाय WhatsApp गटांचा वापर करून, लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संपर्क सुलभ व पारदर्शक झाला आहे. केंद्र शासन पुरस्कृत NSTFDC योजना अंमलबजावणीत जव्हार कार्यालयाने गेल्या तीन वर्षांपासून राज्यात अव्वल क्रमांक कायम राखला आहे.सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा कर्ज वसुलीत सकारात्मक उपयोग करणे, हप्त्यांची माहिती वेळेवर देणे, कर्ज मंजुरी स्थिती अपडेट करणे यामुळे लाभार्थ्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांच्या यशोगाथा व शासकीय शिबिरांची माहिती मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यात आली आहे.
राज्यातील शबरी महामंडळाच्या सर्व प्रकल्प कार्यालयांमध्ये सोशल मिडियाचा वापर करून कर्ज वसुली सुरू करणारे पहिले कार्यालय म्हणून जव्हार शाखेची ओळख निर्माण झाली आहे. या साऱ्याचा लाभ थेट तळागाळातील आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला असून, शासकीय योजनांची जाणीव व उपलब्धता वाढली आहे.
या यशामागे जवळून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न, दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि नेतृत्वाचा मोलाचा वाटा आहे.
प्रतिक्रिया–
“शबरी महामंडळाच्या जव्हार कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून योजनांची अंमलबजावणी सक्षमपणे केली आहे. WhatsApp व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा नियोजन, कर्ज वसुली व माहिती आदानप्रदानासाठी सकारात्मक उपयोग करून शबरी कार्यालय जव्हार राज्यस्तरावर आदर्श ठरले आहे.”
– मा. लिना बनसोड व्यवस्थापिका संचालिका
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक
प्रतिक्रिया:
“ही संपूर्ण प्रक्रिया मा. लिना बनसोड मॅडम यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे शक्य झाली. सोशल मिडियाच्या वापरातून लाभार्थ्यांशी थेट संवाद साकारला गेला, योजनांबद्दल जागरूकता वाढली. भविष्यात या मॉडेलचा उपयोग इतर शाखांना देखील नक्की होईल.”
- राजेश पवार शाखा व्यवस्थापक, कोकण विभाग
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., शाखा जव्हार, जि. पालघर
प्रतिक्रिया:
“आम्हाला आता शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळते, कर्ज प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. WhatsApp वरून हप्त्यांची आठवण आणि शिबिरांची माहिती मिळत असल्यामुळे खूप सोय झाली आहे. शबरी महामंडळाच्या या नविन पद्धतीमुळे आम्हाला खूप फायदा झाला.”
गणेश पडवले धानिवरी लाभधारक,













