दृष्टी न्यूज संपादक सुधीर घाटाळ :राजकारणात साजरे होणारे वाढदिवस हे बहुधा मोठ्या सोहळ्यांचे निमित्त ठरतात, मात्र पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी याला अपवाद ठरवत आपल्या वाढदिवसाचा दिवस सामाजिक कार्य आणि रुग्णसेवा यासाठी अर्पण केला.

दि. २४ जुलै रोजी आमदार गावित यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयास भेट देत तेथील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श उभा केला.यावेळी त्यांनी दुर्गम भागांतून आलेल्या अनेक गरजू रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला. डॉक्टर आणि परिचारिकांशी चर्चा करून रुग्णालयातील सेवा-सुविधांची माहिती घेतली.वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वाघमारे यांनी यावेळी गावित यांना पावसाळी आजारांबाबत, विशेषतः सर्पदंश, विंचूदंश आणि गरोदर महिलांच्या वाढत्या नोंदणीबाबत सविस्तर माहिती दिली.रुग्णालय भेटीनंतर आमदार गावित यांनी विवळवेढे येथे महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले आणि भंडाऱ्याचे आयोजन केले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारचा मोठा समारंभ न करता सामाजिक उपक्रमांनाच प्राधान्य दिले.

या प्रसंगी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, शिवसेना डहाणू तालुकाप्रमुख संतोष देशमुख, अभिजित देशक, ऍड. विराज गडग, राजकुमार गिरी, शैलेश घारपुरे, धवल मेहर, सुधीर वा.घाटाळ, कौशल कामडी प्रविण वरठा,सुदाम मेरे,गणेश गावित, अतुल नाईक, आकाश भराडे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.आमदार गावित यांच्या या सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत असून, हे कार्य इतर लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.














