संपादक सुधीर घाटाळ 9834756487
डहाणू तालुक्यातील वधना–निकणे परिसरात सुसरी नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे या भागातील जीवनावश्यक रस्ता पूर्णपणे ठप्प झाला असून, ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.या गंभीर परिस्थितीत अखेर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

वधना–निकणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, तातडीने पूल दुरुस्त करून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पूल बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे अशक्य झाले आहे.

तसेच शेतमालाची वाहतूक ठप्प झाली असून आर्थिक संकटही वाढले आहे.ग्रामस्थांनी शासनाने तातडीने पूल दुरुस्त करून रस्ता सुरू करावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आदिवासी पारंपरिक कलाकार संस्थेचे अध्यक्ष वेशू गुहे, पेसा अध्यक्ष दिलीप घोषे, यतीन नम, नकुल घाटाळ, योगेश तमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली.यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित विभागाचे अभियंते घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असून, लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्याची शक्यता आहे.
ताज्या घडामोडींसाठी व तुमच्या जाहिराती प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा – 9834756487













