धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त कासा उपजिल्हा रुग्णालय कासा येथे सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना केळी व बिस्किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या वेळी डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख, उपतालुका प्रमुख राजेश कासट, शाखा प्रमुख अतुल नाईक, विभाग प्रमुख एकनाथ सोनकळे, युवा तालुका प्रमुख विनोद चौरे, युवा उपतालुका प्रमुख सुधीर घाटाळ, महिला संघटिका दिपाली धानमेहेर, नम्रता धर्ममेहेर, युवा शाखाधिकारी संदीप धानमेहेर, सुमित गिरी, शेखलाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे कार्य हे समाजासाठी आदर्श असल्याचे सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम घेऊन समाजात सकारात्मकता पसरवणे ही खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले. रुग्णालय प्रशासन व रुग्णांनी या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.













