भाविकांना दिलासा; पुजारी व दुकानदारांचा पुढाकार
पत्रकार-सुधीर घाटाळ

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही. मात्र गडावरील पुजारी, स्थानिक दुकानदार आणि काही युवकांनी एकत्र येऊन श्रमदानाचा मार्ग निवडला. त्यांनी खडी, रेती व सिमेंट आणून रस्ता काँक्रीट केला. काही दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मार्ग पुन्हा सुरक्षित करण्यात आला.

या उपक्रमामुळे गडावर येणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय स्थानिकांनी केलेल्या श्रमदानातून हे काम पूर्ण झाले. त्यामुळे सामाजिक एकतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण उभे राहिले आहे.

भाविकांनी व गावकऱ्यांनी या कार्याचे कौतुक केले असून भविष्यात अशा समस्या उद्भवल्यास प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.










