दृष्टी न्यूज प्रतिनिधी:शैलेश तांबडा
पालघर : दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.४० वाजता मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे घाटकरपाडा येथील नाशिक-जव्हार रोडवर वाघ नदीच्या पुलाखाली, अज्ञात आरोपींनी २५ ते २७ वर्षे वय असलेल्या अनोळखी महिलेचा कापडी स्कार्पने गळा आवळून तिचा खून केला. त्या नंतर तिचा मृतदेह सुतळीच्या गोणीत भरून पुलावरून खाली फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेबद्दल मोखाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनामध्ये अनोळखी महिलेची ओळख पटविणे आणि खून करणारे आरोपी पकडणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी आढळलेल्या गोणीवर “SM 28” असा मार्क व मटर (वटाणे) माल असल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान, मटरचा माल मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून महाराष्ट्रात येत असल्याचे समजले. यामुळे, गोणी संबंधित व्यापारी आणि स्थानिक पुरवठा साखळीचा तपास करण्यात आला.
वापी आणि सिलवासा परिसरात प्रसिध्द करण्यात आलेल्या शोधपत्रिकेवरून, कासा महालक्ष्मी मंदिर येथे तीन दिवसांपूर्वी मयत महिला एक स्विप्ट डिझायर कारमध्ये दिसली होती. अधिक तपास घेतल्यावर, कारच्या मागे बालाजी वाघमारे आणि त्याचे दोन साथीदार असल्याचे उघडकीस आले.
तांत्रिक तपासानुसार, मयत महिलेचे नाव काजोल गुप्ता, रा. सिलवासा, नेपाळ येथील असे होते. तिचे प्रेमसंबंध राजुकुमार वरही याचेशी असल्याचे समजले. पोलीसांनी पुढील तपास घेतला आणि यातील आरोपींना अटक केली. आरोपी १) राजुकुमार रासबिहारी वरही (२४ वर्षे, नेपाळ), २) सुरेश रामशोभीत सिंग (५० वर्षे, बिहार), आणि ३) बालाजी अशोक वाघमारे (३४ वर्षे, तुळजापुर, धाराशिव) आहेत.
पोलीस तपासानुसार, आरोपींनी काजोल गुप्ताला सिलवासा येथून घेऊन डहाणु आणि त्र्यंबकेश्वर परिसरात फिरवले आणि नंतर मोखाडा येथील जंगलात तिचा खून केला. मयतला गोणीत भरून वाघ नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी पालघर पोलीसांनी यशस्वीपणे पकडले असून, तपास कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. या कामगिरीसाठी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर आणि गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शन होत आहे.
तपास पथकातील पोलिसांचे नाव – पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर, सपोनि/प्रेमनाथ ढोले (नेम. मोखाडा पो.स्टे.), सपोनि/अनिल व्हटकर, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि/रविंद्र वानखेडे, श्रे.पोउनि/सुनिल नलावडे, सहा. फौजदार सुनिल किसन माळी (तलासरी पो.स्टे.), पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/दिलीप जनाठे, पोहवा/संतोष निकोळे, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोना/कल्याण केंगार सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.पालघर पोलीस विभागाने या कामगिरीत उत्कृष्टरित्या कार्य केले आहे.
