दृष्टी न्यूज संपादक सुधीर घाटाळ
डहाणू: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर नेस वाडिया फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने आसवे ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर मा. कुशाला शेट्टी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणासोबतच प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती केली गेली. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. प्लास्टिकच्या विल्हेवाटीचे महत्त्व आणि पर्यायी उपायांवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमास आसवे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू गुरोडा, सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा ताई यांची उपस्थिती लाभली. त्यांनीही स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी सर नेस वाडिया फाउंडेशनचे करिश्मा करोठिया, नितेश वाघ, विशाल ठाकरे, सचिन झाटे यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांमध्येही निसर्गाविषयी आस्था वाढीस लागली आहे. अशा उपक्रमांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्यास समाजाला प्रोत्साहन मिळते, असे मत या वेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
बातमी किंवा जाहिरातसाठी संपर्क करा 9834756487
