दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर :
महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद (२६ एप्रिल २०२५) पासून पालघर जिल्ह्यात सुरू होत आहे. तीन दिवस चालणारी ही परिषद आदिवासी सेवा मंडळाची आदिवासी आश्रम शाळा, चहाडे, तालुका पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे 300 ते 350 महिला कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

या परिषदेचे उद्घाटन आज होणार असून, “विकास प्रक्रिया,विकास प्रकल्प आणि महिलांचे आरोग्य” या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. विशेषतः आदिवासी, कष्टकरी आणि अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या, उपलब्ध सेवा आणि शासनाच्या धोरणांचा आढावा घेतला जाईल. परिषदेमध्ये महिला कार्यकर्त्यांच्या अनुभवावर आधारित धोरणात्मक व कायदेशीर सुधारणा सुचविण्यासाठी चर्चा घडवली जाणार आहे.

परिषदेमध्ये मुलींच्या शिक्षण, पोषण, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेविषयी युवा मुलींचा सक्रिय सहभाग घेऊन विशेष चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आरोग्यावरील परिणामांचे विश्लेषण, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि महिला व युवतींच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे.

ही परिषद सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारली असून, यापूर्वी मुंबई, पुणे, नागपूर, शहादा,बीड, नंदुरबार, चिपळूण नाशिक आणि चंद्रपूर येथे यशस्वीरीत्या पार पडली आहे. यंदाची नववी परिषद पालघरमध्ये होत आहे.
स्थानीय संयोजन समिती सदस्य
रमाकांत पाटील,आरोहन – अमित नारकर, प्रदीप खैरकर, कौस्तूभ घरत, सुजाता आयरकर-दादोडे, कष्टकरी संघटना – ब्रायन लोबो,मधू बाई धोडी,आदिवासी सहज शिक्षण संस्था – वर्षा फातरपेकर,विद्या पाटील,ज्योती केळकर,सुनीता बागल,तनुजा हरड,जयश्री सामंत – NAPM – सुजय मोरे,मच्छीमार संघटना – पूर्णिमा मोहरे,भूमी सेना आदिवासी एकता परिषद – मीना धोदडे, नीता काटकर,युवा – गीता डाबरे,आदिवासी एकता परिषद – कर्ती बरठा,राष्ट्रसेवक दल – प्रज्ञा गावड,सख – नेटी लोपिस,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अण्णा कडलसकर,ज्ञानज्योती कम्युनिटी कॉलेज, करजगाव, शैला क्रॅस्टो,
राज्य संयोजन समिती सदस्य
डॉ. मनीषा गुप्ते, काजल जैन – मासूम, पूणे! शुभदा देशमुख, विजयलक्ष्मी वाघरे- आम्ही आमच्या आरोग्यासाठी, गडचिरोली !
रंजना कान्हेरे – जनार्थ आदिवासी विकास संस्था, शहादा ! शुभांगी कुलकर्णी- समता प्रतिष्ठान, बीड! अनिकेत लोहिया, अरुंधती पाटील – मानवलोक, आंबेजोगाई! धनाजी धोतरकर- लोकप्रबोधन मंच, तुळजापूर! डॉ. शुभांगी अहंकारी – हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर! अच्युत बोरगावकर! विजया जोरी – प्रयास संस्था, पुणे! तृप्ती जोशी – साथी! सुनीता गांधी- संवाद, चिपळूण! डॉ. सुहास कोल्हेकर- जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, पुणे.

या परिषदेमुळे महिलांच्या आरोग्य हक्कांसाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार असून, शासन धोरणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारसी तयार केल्या जाणार आहेत.
