दृष्टी न्युज सुधीर घाटाळ
डहाणू (पालघर) – ज्ञानभारती संस्थेचे एस.आर. करंदीकर कॉलेज, डहाणू येथे 29 एप्रिल 2025 रोजी (मंगळवार) 2023-24 या शैक्षणिक वर्षातील बी.ए., बी.कॉम. आणि बी.एम.एस. शाखेतील विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्ञानभारती सोसायटीचे चेअरमन मा. श्री. बोमन बी. इराणी यांनी भूषविले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्राचार्य डॉ. रुपेश भाऊ गायकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रीतम सुरती यांनी तर संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राध्यापक जे.जे. खांडवी यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांच्या प्रयत्नांना कॉलेजमधील सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सोहळ्याद्वारे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यात आला आणि संस्थेच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेची साक्ष पटली.
