दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
चारोटी येथे एकमेव असलेल्या CNG पंपावर रिक्षा, इको आणि इतर CNG वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली दिसून येत आहे. सकाळी लवकरच वाहन चालक रांगेत उभे राहत असून, पंपावर तासन तास थांबावे लागत आहे. परिणामी त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होत असून, रोजीरोटीवर आळा येत आहे.

CNG वाहतुकीवर अवलंबून असलेल्या चारोटी आणि आसपासच्या परिसरातील चालकांची संख्या मोठी आहे. मात्र चारोटीमध्ये केवळ एकच CNG पंप असल्याने सर्व वाहने एकाच ठिकाणी भरायला येत असल्यामुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चालकांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे.
“आम्ही तासान तास रांगेत उभे राहतो, गाडी चालवायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही कसे हप्ते भरणार? घर चालवायचं कसं?” असा सवाल स्थानिक रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे. यामुळे चालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून चारोटी परिसरात अधिक CNG पंप उभारण्याची गरज आहे, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिक करत आहेत.

प्रमुख मांगण्या:
चारोटी परिसरात केवळ एकच CNG पंप
सकाळपासूनच वाहनांची लांबच लांब रांग
वाहनचालकांचे व्यवसाय ठप्प, आर्थिक नुकसान
अनेक वाहनचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला
नवीन CNG पंप उभारण्याची मागणी जोरात
सध्या यात्रेचा हंगाम सुरू आहे आणि याच काळात आम्हाला चांगला रोजगार मिळू शकला असता. मात्र CNG पंपावर वाढलेल्या गर्दीमुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन पुरेसा CNG उपलब्ध करावा किंवा दुसरा पंप तात्काळ सुरू करावा.”
प्रवीण वरठा, रिक्षाचालक अध्यक्ष तथा CNG ग्राहक
