दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू : सोमवार, दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी भारतीय जनता पार्टी, पालघर जिल्ह्याच्यावतीने मंडळ अध्यक्ष निवडणूक डहाणू येथे भाजप कार्यालयात उत्साहात पार पडली. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

या निवडणुकीत वसई-विरार, पालघर, विक्रमगड, डहाणू, जव्हार, मोखाडा, वाडा यासह विविध तालुक्यांतील एकूण 30 मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली. निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. नवनिर्वाचित अध्यक्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी साहेब, जगदीश राजपूत, पंकज कोरे, नरेश आकरे, सुशील औसरकर तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांची नावे:
डहाणू शहर – पीनल शाह
जामशेत – वसंत गोरवाला
तलासरी – विवेक करसोडा
बोर्डी-घोलवड – लकेश राऊत
मोखाडा – मिलिंद झोले
जव्हार पूर्व – कुणाल उदावंत
जव्हार पश्चिम – विठ्ठल थेटले
विक्रमगड – रवि भडांगे
कंचाड – संदीप गोवारी
पालघर शहर – भाविन कन्सारा
चिंचणी – देवानंद शिंगाडे
सातपाटी – प्रणय म्हात्रे
कासा – आशिष चव्हाण
मनोर – हर्षद पाटील
सोनाकळे – संतोष पाटील
कुडूस – मनीष पाटील
वाडा शहर – स्वप्नील रोठे
या नव्या नेतृत्वामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जाहिराती बातमी देण्यासाठी संपर्क :9834756487
