दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ:
गंजाड येथे RKC कंपनीच्या कामामुळे बनवण्यात आलेल्या खडिकरणाच्या पर्यायी रस्त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अपघाताच्या घटनांची शक्यता वाढली होती, तर रस्त्यावरील धुळीमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. ‘दै. चालू वार्ता’ने दिनांक 18 मार्च 2025 रोजी या समस्येवर प्रकाश टाकत हकीकत मांडली आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पडला असून, संबंधित यंत्रणा तातडीने जागी झाली. अखेर गंजाडमधील हा पर्यायी रस्ता डांबरीकरण करून नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुलभ करण्यात आला आहे.
आता:

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वैतागलेले स्थानिक रिक्षा आणि दुचाकी चालक आता समाधान व्यक्त करत आहेत. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिक आणि वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

आधी-

“आम्ही वारंवार तक्रारी करत होतो. ‘चालू वार्ता’ने आवाज उठवल्यामुळेच ही समस्या सुटली. आता प्रवास सुसह्य झाला आहे.”
प्रविण वरठा रिक्षा चालक संघटना अध्यक्ष
“प्रशासनाने योग्य वेळी निर्णय घेतल्याने अपघातांची शक्यता टळली. ‘चालू वार्ता’च्या सहकार्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला.”
कौशल कामडी गंजाड प्रभारी सरपंच
