दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या वतीने “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत वसुंधरा दिनाचे औचित्य साधून २२ एप्रिल रोजी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेद्वारे समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक व अन्य कचऱ्याची साफसफाई करण्यात आली. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करत स्वच्छ व हरित भविष्यासाठी योगदान देण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त झाला. ग्रामस्थांच्या सहभागाने उपक्रम अधिक प्रभावी ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या मोहिमेत डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत काटेला, उपसरपंच मनोज राऊत, ग्रामसेवक शेवाळे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा:9834756487
