सात वर्षांनी मिळालेला आनंद सात महिन्यांत हरपला
दृष्टी न्यूज प्रतिनिधी शैलेश तांबडा
विरार : विरार (पश्चिम) येथील एका गगनचुंबी इमारतीत बुधवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. केवळ सात महिन्यांचे बाळ आईच्या हातून निसटून २१व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला ताप होता आणि तब्येत सुधारल्यावर आई त्याला डॉक्टरकडून घरी घेऊन आली होती. घरी आल्यानंतर पाहुणे भेटायला आले होते. त्यावेळी बाळाला खांद्यावर घेत असताना आईला चक्कर आल्याने तिचा तोल गेला आणि बाळ तिच्या हातातून निसटून थेट खाली पडले.
या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विशेषतः या दाम्पत्याला सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अपत्यप्राप्ती झाली होती, आणि अवघ्या सात महिन्यांतच त्यांच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले.
या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी दिली.
बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपर्क करा-9834756487
