डॉ. हेमंत सवरा व राजेंद्र गावित यांची विशेष उपस्थिती; 42 नवीन आदिवासी डॉक्टरांचा सत्कार
दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू, दि. 27 एप्रिल 2025 – पालघर आदिवासी डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन व आदिवासी डॉक्टरांचा सत्कार सोहळा डहाणू तालुक्यातील गंजाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला पालघरचे विद्यमान खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, तसेच गुजरात येथील समस्त आदिवासी समाजाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गरासिया व डॉ. ए. जी. पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यास 70 ते 80 आदिवासी डॉक्टर सहकुटुंब उपस्थित राहिले होते, तर एकूण उपस्थितांची संख्या 160 ते 180 च्या दरम्यान होती. या वेळी खासदार व आमदार यांच्या हस्ते 42 नवीन आदिवासी डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. सवरा व आमदार गावित यांनी असोसिएशनला लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. “जिल्ह्याच्या ठिकाणी जमीन संपादन करून असोसिएशनचे कार्यालय व मोठे हॉस्पिटल उभारण्यात यावे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर केल्यास आम्ही मंजुरीसाठी सर्वतोपरी मदत करू,” असे त्यांनी सांगितले. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असोसिएशनने उत्तम उपक्रम राबवावेत, अशी शुभेच्छाही दिली.
गुजरात येथून आलेल्या डॉ. प्रदीप गरासिया व डॉ. ए. जी. पटेल यांनी गुजरातमधील आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनचा यशस्वी प्रवास सांगत मार्गदर्शन केले व आपले अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले.

कार्यक्रमात सिव्हिल सर्जन डॉ.रामदास मराड, कुटीर रुग्णालय डहाणूचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भोये, आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव डॉ. सुनिल पऱ्हाड, माजी पंचायत समिती सदस्य अभिजित देसक, प्रभारी सरपंच कौशल कामडी, अध्यक्ष डॉ. शरद सातवी, सचिव राहुल कामडी, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत थुलार, माजी सचिव डॉ. बाळाराम बसवत, डॉ.अमित देसक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश चौधरी, सह सचिव डॉ. उमेश भुसारा, खजिनदार डॉ. राजू बारात, सह खजिनदार डॉ.अक्षय गडग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व डॉक्टरांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

