दृष्टी न्युज सुधीर घाटाळ
तलासरी (२९ एप्रिल २०२५): महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत तलासरी येथे उभारण्यात येणाऱ्या १८०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमात तलासरी तहसीलदार अमोल पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे तसेच महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या धान्य गोदामाच्या उभारणीतून शासनाची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास आणि शासकीय यंत्रणांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या दृष्टीनेही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.आमदार कॉ. विनोद निकोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या गोदामामुळे तलासरी व परिसरातील प्रशासनाला बळकटी मिळेल व धान्य ठेवण्याची क्षमता ही वाढेल.अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागात उभ्या राहणं ही काळाची गरज आहे, आणि आपण त्या दिशेने प्रयत्नशील आहोत.”

सुमारे २२४ लक्ष रु. खर्चाच्या या प्रकल्पाची जबाबदारी सिद्धिविनायक इंजिनिअर अँड कॉन्ट्रक्टर या कंपनीला देण्यात आली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व स्थानिक प्रशासन यांचे समन्वयातून कार्य सुरू आहे.
बातमी किंवा जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा 9834756487
