दृष्टी न्यूज प्रतिनिधी- शैलेश तांबडा : पालघर जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले. यामुळे खेड्यांमधील शेतकरी आणि ग्रामस्थ अडचणीत सापडले असताना, पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी तात्काळ हालचाल करत थेट शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गावोगाव दौरा केला.
संसदेचे अधिवेशन संपताच डॉ. सवरा यांनी खोडाळा व मोखाडा तालुक्यातील केवनाळे, भवानीवाडी, दुधगाव, सप्रेवाडी, वाशिंद, राजेवाडी, जोगलवाडी या गावांना भेट दिली.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत स्थानिक शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला.
“या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तातडीची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” अशी ग्वाही डॉ. सवरांनी दिली. सवरांनी प्रशासनाशी समन्वय साधून तातडीच्या मदतीच्या उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश दिले.

या दौऱ्यानंतर ग्रामस्थांमध्ये आश्वस्ततेचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाकडून लवकरच मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. सवरांचे मैदानात उतरून केलेले निरीक्षण आणि तत्काळ प्रतिसाद हे जनतेसाठी दिलासा देणारे ठरले आहे.

बातम्या व जाहीरात देण्यासाठी:9834756487
