दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
सामाजिक कार्यकर्ते आणि युवा एल्गार आघाडी, महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. विराज गडग यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वाणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात मोफत नेत्र तपासणी, रक्त तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
अँड. गडग हे गेल्या १५ ते १७ वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय असून, त्यांनी विधवा, निराधार, अपंग, वृद्ध तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. प्रत्येकवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यविषयक सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिरात स्थानिक नागरिकांना मोफत नेत्र तपासणी, रक्त तपासणी तसेच रक्तदान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन युवा एल्गार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाठे यांनी केले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.
बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा:9834756487
